“पर राज्यातून,जिल्हातुन,तालुक्यात सामान विक्रीसाठी आलेल्या फेरीवाल्यांना प्रतिबंधीत करा” – शशिकांत बतकमवार

“पर राज्यातून,जिल्हातुन,तालुक्यात सामान विक्रीसाठी आलेल्या फेरीवाल्यांना प्रतिबंधीत करा”

शशिकांत बतकमवार आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष सिन्देवाही यांची मागनी

तहसिलदारांना दीले निवेदन

देशात सर्वत्र कोरोणा विषाणुने थैमान घातले होते आत्ता काही प्रमानात कोरोणा विषाणूचा प्रादूर्भाव कमी झाला असला तरी धोका कायम आहे.शासनाने तिसरी लाट येण्याची भिती व्यक्त केली असतांनाही सिन्देवाही तालूक्यात,शहरात परराज्यातून शेकडोच्या वर फेरावाले,चटई,प्लास्टीके वाटे,मनी,फोम गादी,प्लास्टीकचे हारे प्लास्टीक खूर्च्या ईत्यादी ना,ना प्रकारचे सामान किकतांना दीसुन येत असल्यामुळे कोरोणा सक्रमन वाढण्याची शक्यता आहे.
शासनाने स्थानीक भाजीपाला वाले,व्यापारी,कर्मचारी यांचे सह फुटपाथ विक्रेत्यांनाही कोरोणा लस सक्तीचे केले आहे,राशनधारक तर राशन मिळनार नाही या भितिने लसीकरन करून घेत आहेत.या फेरीवाल्यांनी मात्र कोरोणा लस घेतली की नाही या बाबत शंका आहे हे फरीवाले प्रत्येक गल्ली,गल्लीत,घरा,घरात जाउन आपला सामान विक्री करीत असल्याचे दिसुन येत आहे त्यामुळे बरेच परीवारातील व्यक्ती या फेरीवाल्यांच्या थेट संपर्कात येत असुन कोरोणा वाडीस कारनीभूत ठरू शकतात करीता आम आदमी पार्टी कडून या फेरीवाल्यांना प्रतीबंधीत करण्यात यावे अशी मागनी आम आदमी पार्टी सिन्देवाहीचे तालुका अध्यक्ष शशिकांत बतकमवार यांनी तहसीलदार सिन्देवाही यांना निवेदनाद्वारे केली आहे, निवेदन देतांना शशिकांत बतकमवार आ.ता.अध्यक्ष सिन्देवाही,असाक शेख,खुशाब लांजेवार पिकुमार पोपटे,आदील पठान,शांताराम आदे सह कार्यकर्ते उपस्थीत होते.