पालकमंत्र्यांच्या हस्ते लसीकरण 30 वाहनांचे उद्घाटन

पालकमंत्र्यांच्या हस्ते लसीकरण वाहनांचे उद्घाटन महापारेषणच्या सीएसआर फंडातून जिल्ह्याला मिळालेल्या 30 लसीकरण वाहनांचे उद्घाटन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यासाठी उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रयत्नातून 30 लसीकरण गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात दोन गाड्या याप्रमाणे जिल्ह्यातील 15 तालुक्यांना या गाड्या देण्यात येतील. त्यामुळे निश्चितच लसीकरणाचा वेग वाढेल. विशेष म्हणजे गावागावातील जे नागरीक प्रवास करून लसीकरणाकरीता येऊ शकत नाही, त्यांच्यापर्यंत हे वाहन पोहचणार आहे. आरोग्य यंत्रणा मजबूत करणे व जास्तीत जास्त पात्र नागरिकांचे लसीकरण करणे, हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा संध्या गुरनुले, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत आदी उपस्थित होते.