सरपंच संघटना सिंदेवाही तर्फे म.रा.वि.वि.कं.ला निवेदन

सरपंच संघटना सिंदेवाही तर्फे म.रा.वि.वि.कं.ला निवेदन

आज दिनांक 28.8.2021 ला सरपंच संघटना सिंदेवाही ह्यांची बैठक पार पडली सदर बैठकीत MSEB विभागाला निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून MSEB विभागातर्फे तालुक्यातील ग्राम पंचायतीची स्ट्रीट लाईट कट करण्याची कार्यवाही सुरू असून ही कार्यवाही अन्यायकारक आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून संबंधित वीज देय्यके ही जि.प.च्या माध्यमातून भरण्यात येत होती परंतु आता सदर बिल भरण्याची जबाबदारी ही ग्राम पंचायती वर देण्यात आली आहे.
ग्रामपंचायतींचा स्व निधी बघता सदर वीज देय्यके भरण्यास ग्राम पंचायती असक्षम आहेत. ह्या बाबत चे निवेदन ह्या पूर्वी मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार मंत्री मदत व पुनर्वसन म.रा. तथा पालकमंत्री चंद्रपूर ह्यांच्या कडे सरपंच संघटना सिंदेवाही ह्यांच्या वतीने देन्यात आलेली आहेत.
संबंधित निवेदनाच्या माध्यमातून पुढील निर्णय लागे पर्यंत कार्यवाही स्थगित करावी व ज्या ग्राम पंचायत ची वीज खंडित करण्यात आलेली आहे त्याची ताबडतोब जोडणी करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.
ह्या प्रसंगी राहुल बोडणे अध्यक्ष सरपंच संघटना सिंदेवाही,रूपालि रत्नावार उपाध्यक्ष सरपंच संघटना सिंदेवाही, मा.राहुलभाऊ पंचभाई सचिव सरपंच संघटना सिंदेवाही ह्यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले असून तालुक्यातील सर्व ग्रा.पं.सरपंच व उपसरपंच ह्यांची उपस्थिती होती .