भंडारा : महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियमांतर्गत           पुनपरिक्षण व विभागीय शुल्क नियामक समिती गठित                   

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियमांतर्गत पुनपरिक्षण व विभागीय शुल्क नियामक समिती गठित                                            

भंडारा,दि.28:- महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनिमांतर्गत पुनपरिक्षण व विभागीय शुल्क नियामक समिती शासन परिपत्राकान्वये गठित करण्यात आलेली आहे.

            विभागीय शुल्क नियामक समिती सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश व्ही.टी. सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण मंडळ नागपूर, सनदी लेखापाल अक्षय गुल्हाणे, सेवानिवृत्त शिक्षण संचालक चंद्रमणी रा. बोरकर हे सदस्य असतील तर प्रादेशिक शिक्षण उपसंचालक (विभागीय शिक्षण उपसंचालक) नागपूर पदसिध्द सदस्य सचिव आहे, असे शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद भंडारा यांनी कळविले आहे.