महिला व बालकल्याण समितीच्या १२ नवीन सदस्यांची निवड

महिला व बालकल्याण समितीच्या १२ नवीन सदस्यांची निवड

चंद्रपूर, ता. ३० :चंद्रपूर शहर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या नव्या १२ सदस्यांची निवड झाल्याची घोषणा महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी महानगरपालिकेच्या आमसभेत केली.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत गुरुवारी (ता. ३०) राणी हिराई सभागृहात आमसभा पार पडली. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, आयुक्त राजेश मोहिते यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ३१ (अ) अन्वये प्रमाणशिर प्रतिनिधीत्व देवून नामनिर्देशित केलेले जुन्या १२ सदस्याऐवजी नविन १२ सदस्यांची महिला व बालकल्याण समितीवर नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती करण्याचा ठराव झाला. चंद्रपूर मनपाच्या १२ सदस्यीय महिला व बालकल्याण समितीवर त्यांच्या जागी नव्या सदस्यांची निवड व्हावी, यासाठी महापौरांनी पक्षीय बलाबलनुसार आपल्या पक्षाच्या सदस्यांची नावे पक्षाच्या गटनेत्यांनी बंद लखोट्यात द्यावीत, असे आवाहन केले होते. त्यानुसार भाजपने पुष्पा उराडे, शीतल कुळमेथे, जयश्री जुमडे, आशाताई आबोजवार, अनुराधा हजारे, कल्पना बगुलकर, माया उईके, शिला चव्हाण यांची नावे दिलीत. काँग्रेस कडून सुनीता लोढीया, संगीता भोयर, शहर विकास आघाडीकडून मंगला आखरे, तर बसपकडून प्रदीप डे यांची नावे लेखी पत्राद्वारे महापौरांकडे सादर केली. या सदस्यांची समिती सदस्यपदी निवड झाल्याची घोषणा महापौरांनी केली.