आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एचआयव्ही विषयावर पोस्टर, मास्क, प्रचारात्मक व्हिडीओ पाठविण्याचे आवाहन

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एचआयव्ही विषयावर

पोस्टर, मास्क, प्रचारात्मक व्हिडीओ पाठविण्याचे आवाहन

भंडारा,दि.20 : 12 ऑगस्ट 2021 हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने ऑनलाईन पोस्टर स्पर्धा, मास्क डिझायनिंग स्पर्धा, सोशल मीडियावर एक मिनिटाचा स्टिगमा फ्री एचआयव्ही आणि कोविड टॉल्क प्रचारात्मक व्हिडीओ, मिम्स तयार करणे इत्यादी स्पर्धेचे आयोजन 12 ते 26 ऑगस्ट या कालावधीत केलेले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धेकरिता एचआयव्ही/एडस विषयानुसार पोस्टर, मास्क, प्रचारात्मक व्हिडीओ, मिम्स स्वत:चे घरी तयार करुन 9860277604, 9423605925 तसेच संबंधित तालुकास्तरावरील आयसीटीसी- समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचे व्हॉट्स ॲप क्रमांकावर पाठवावे. सदर स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बक्षिस व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकांनी साहित्यावर स्वत:चे नाव, महाविद्यालयाचे नाव व मोबाईल क्रमांक नमूद करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.