सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे ऑगस्ट 2021 करिता नियंत्रित शिधाजिन्नसांचे वितरण

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे

ऑगस्ट 2021 करिता नियंत्रित शिधाजिन्नसांचे वितरण

चंद्रपूर दि.17 ऑगस्ट : चंद्रपूर तालुका शिधापत्रिका क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे, ऑगस्ट 2021 करिता कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेल्या नियंत्रित शिधाजिन्नसांचे परिमाण व दर निश्चित करण्यात आले असून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील पात्र लाभार्थ्यांना नियमित धान्य नियमित दराप्रमाणे चालू राहील. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना गहू व तांदूळ मोफत मिळणार आहे.

असे राहतील वितरित करण्यात येणाऱ्या शिधाजिन्नसांचे वस्तूंचे दर व परिमाण :

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिका धारकांना गहू प्रति व्यक्ती 3 किलो  2 रुपये प्रति किलो दराने तर तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो 3 रुपये प्रति किलो  दरानुसार देय राहील.

अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत गहू प्रति शिधापत्रिका 15 किलो,दोन रुपये प्रति किलो दराने व तांदूळ प्रति शिधापत्रिका 20 किलो तीन रुपये प्रति किलो दरानुसार देय राहील, तर साखर 20 रुपये प्रति किलो दराने, प्रति शिधापत्रिका 1 किलो याप्रमाणे शिधापत्रिका धारकांना देय राहील.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच अंत्योदय अन्न योजनेतील  शिधापत्रिका धारकांना गहू व तांदूळ मोफत असून वरील दोन्ही योजनेतील शिधापत्रिका धारकांना गहू प्रति व्यक्ती 3 किलो तर तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो परिमाणाने देय राहील, असे चंद्रपूरचे तहसीलदार यांनी कळविले आहे.