उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत लायसन्स (कॅम्प) शिबिराचे आयोजन

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत लायसन्स (कॅम्प) शिबिराचे आयोजन

चंद्रपूर दि.17 ऑगस्ट : राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत वेळोवेळी निर्गमित केलेल्या कोरोना वर्तणूक विषयक सूचना व निर्देशांचे यथोचितरित्या काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीवर जिल्हयातंर्गत लायसन्स (कॅम्प) शिबिर  सुरू करण्यात येत आहे. सदर शिबिरामध्ये 50 शिकाऊ अनुज्ञप्ती व 120 पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाइन नोंदणी नुसार देण्यात येणार आहेत.

ही आहेत शिबिराचे ठिकाण :

दि.23 ऑगस्ट 2021 रोजी आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 25 ऑगस्ट रोजी एन. एच. महाविद्यालय ब्रह्मपुरी, 27 ऑगस्ट रोजी शरद पवार महाविद्यालय गडचांदूर तर 30 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह, चिमूर या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.