चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा नवरगांव नगर च्या वतीने कोविड योध्याचा सत्कार

कोविड योध्याचा सत्कार
भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा नवरगांव नगर च्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगांव येथील कर्मचारी वर्ग व प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगांव अर्तगत येत असलेल्या आशा वर्कर यांचा कोविड योध्या म्हणुन प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. कोविड काळामध्ये सर्व कर्मचारी व आशा वर्कर यांनी सर्वात जास्त योगदान दिले आहे यांची दखल घेत भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपुर जिल्हाच्या वतीने प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आले. यावेळी. श्री.रोशन मुद्दमवार जिल्हा कार्यकारणी सदस्य भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपुर, श्री. प्रकाशजी खोब्रागडे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नवरगांव शहर, श्री.मधुकरजी मडावी माजी सभापति पंचायत समिति सिंदेवाही, श्री. मनोहरराव सहारे महामंत्री भाजपा सिन्देवाही तालुका, मनिष घुघुसकर अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा नवरगांव शहर