चंद्रपूर : स्थानीकाना घर पट्टे मिळण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मुख्याधिकारी यांना निवेदन

स्थानीकाना घर पट्टे मिळण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मुख्याधिकारी यांना निवेदन

वरोरा शहरात कित्येक वर्षापासून अनेक कुटुंब नगर परिषद च्या जागेवर राहत आहे पन अजूनही त्यांना घरपट्टे मिळालेले नाही, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ज्याना राहायला घर नाही अशा सर्वाना या योजनेचा लाभ मिळायलाच हवा. परंतु वर्षानुवर्ष लोटुनही आज पर्यन्त लोकांना घरपट्टे मिळालेले नाही अशा सर्वाना लवकरात लवकर घरपट्टे देण्यात यावे जेणेकरून त्यांना घरकुलाचाही लाभ घेता येईल या साठी मनविसे ने आज नगर परिषद येथे निवेदन दिले.
निवेदन देते वेळी मनसे चे चंद्रपूर शहर अध्यक्ष मनदीप रोडे हे उपस्थित होते शहरातील नागरिकांना लवकरात लवकर घरपट्टे देण्यात यावे अन्यथा शहरातील नागरिकांना सोबत घेऊन मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असे मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी निवेदन देते वेळी सागितले. यावेळी मनविसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जुंजारे , मनविसे वरोरा तालुका अध्यक्ष गौरव मेले ,मनविसे तालुकाउपाध्यक्ष सत्या मांडवकर,शहर अध्यक्ष हर्षल डोंगरे, शहर सचिव ओम चिकणकर, मनसैनिक आकाश काकडे, मनीष वासुलकर,आनंद गेडाम, पृथ्वी पुरी, करण मेश्राम, भूषण कठाने आणि इतरही कार्यकर्ते लीज धारकांसोबत मोठ्या संख्येने उपस्थित होते .