जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत एस. बी. ए. चे वर्चस्व

जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत एस. बी. ए. चे वर्चस्व

 

सिंदेवाही:- स्थानिक सिंदेवाही येथील सिंदेवाही बास्केटबॉल अकॅडमी (एस. बी. ए.) ने पुन्हा आपले वर्चस्व शालेय स्तरावर गाजविण्यात यशस्वी ठरलेली आहे. नुकताच पार पडलेल्या शालेय बास्केटबॉल स्पर्धेत सिंदेवाही बास्केटबॉल अकॅडमीच्या खेळाडूंनी आपले नाव लौकिक केलेले आहे. चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत एस. बी. ए. च्या अंडर 14 (मुले-मुली),अंडर 19 (मुले-मुली),अंडर 17 (मुले) एकतर्फी सामने करून आपले संघाला प्रथम क्रमांक पटकावून दिला.

तसेच अंडर 17 (मुली) व अंडर 19 (मुली) संघाने सुद्धा द्वितीय स्थान मिळविले.

धुमेश्वरी डोंगरे(U14), अमन हजारे(U14), श्वेता जीवाने(U17), श्रमय वालदे(U17), महिर पठाण(U17), आरती बहिरवार(U19), तन्वी कटकमवार(U19), अभय बहिरवार(U19), भूषण खडसिंगे (U19) या खेळाडूंनी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.

एवढी उंच शिखरे गाठत असून सुद्धा एस. बी. ए. ला वरच्या स्तरावरून सहकार्य कमी मिळत आहे.

कौतुकास्पद कामगिरी केलेल्या खेळाडूंवर सर्व स्तरावरून अभिनंदननाचा वर्षाव होत आहे. खेळाडूंनी आपल्या विजयाचे श्रेय आई-वडील व (एस. बी. ए.) प्रशिक्षक निनाद शेंद्रे सर व मार्गदर्शकांना दिलेले आहे.