भंडारा : जिल्हा नियोजन समितीची सभा आज

जिल्हा नियोजन समितीची सभा आज

भंडारा,दि.7:- जिल्हा नियोजन समितीची सभा 8 ऑगस्ट 2021 रोजी पालकमंत्री भंडारा जिल्हा तथा सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औफाक व मराठी भाषा राज्यमंत्री             डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11.45 वाजता जिल्हा नियोजन भवन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय परिसर भंडारा येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत खालील विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. 25 जानेवारी 2021 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेचे इतिवृत्तास मान्यता प्रदान करणे. जिल्हा वार्षिक योजना 2020-21 मार्च 2021 अखेर झालेल्या खर्चास मंजुरी प्रदान करणे. जिल्हा वार्षिक योजना 2021-22 जुलै 2021 पर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा. कोविड 19 उपाय योजनेंतर्गत लागणारा निधी करिता पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता प्रदान करणे. जिल्हा वार्षिक योजना 2021-22 अंतर्गत विविध योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या प्रस्तावांना मान्यता प्रदान करणे. अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे इतर विषयाचा समावेश असणार आहे. सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्ययावत माहितीसह वेळेवर उपस्थित राहावे.