भंडारा : पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम जिल्हा दौऱ्यावर जिल्हा नियोजन भवन इमारतीचे करणार उद्घाटन

पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम जिल्हा दौऱ्यावर

जिल्हा नियोजन भवन इमारतीचे करणार उद्घाटन

भंडारा दि.7 :- पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम 8 ऑगस्ट 2021 रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौरा पुढील प्रमाणे आहे.

दुपारी 12.10 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 12.15 वाजता जिल्हा नियोजन भवन इमारतीचे उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता भंडारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 2.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून कारधा ता. भंडाराकडे प्रयाण. दुपारी 2.45 वाजता कारधा येथे वैनगंगा नदी पातळीवर आगमन व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी केलेल्या शोध व बचाव साहित्यांचे लोकार्पण. दुपारी 3.15 वाजता कारधा येथून मुरमाडी/सावरी ता. लाखनीकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता मुरमाडी/सावरी येथे आगमन व ऑक्सिजन पार्कच्या भुमीपूजन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 3.45 वाजता जुनी बाजार समिती लाखनी येथे सांस्कृतीक सभागृहाचे भुमीपूजन. सायंकाळी 4.30 वाजता स्थानिक कार्यक्रम. सायंकाळी 5.00 वाजता लाखनी येथून वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.