गडचिरोली : दुर्गम भागातील इच्छुकांनी इग्नू मधील मोफत दुरस्थ शिक्षणाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी दीपक सिंगला

दुर्गम भागातील इच्छुकांनी इग्नू मधील मोफत दुरस्थ शिक्षणाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी दीपक सिंगला

गडचिरोली, दि.03 : इग्नू (इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ) मध्ये दुरस्थ माध्यमाद्वारे समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्यासाठी मोठया प्रमाणात अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. या अभ्यासक्रमांचा लाभ शैक्षणिक विकास साधण्यासाठी उपयुक्त असून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचेसाठी मोफत असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. मोफत अभ्यासक्रमामध्ये अनुसूचित जाती व जमाती मधील व्यक्तींसाठी सर्टीफीकेट, डिप्लोमा , पी. जी. डिप्लोमा व पदवी अभ्यासक्रम मोफत आहेत. इग्नू मधील सर्व अभ्यासक्रम मान्यताप्राप्त असून संस्थेचा वंचितापर्यंत पोहचून त्यांना मदत करणे हा हेतू आहे.

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी गडचिरोली जिल्हयातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या गरजू लोकांना यामधील विविध अभ्यासक्रमांचा फायदा होईल असे सांगितले. गडचिरोली जिल्हयात सायन्स कॉलेज येथे अध्ययन केंद्र आहे. त्या ठिकाणी जिल्हयातील गरजू विद्यार्थी व नागरिकांना संपर्क साधता येईल. तसेच इग्नूचे श्री राजगुरे यांच्या 9730012487 दूरध्वनी क्रमांकावरतीही संपर्क साधून माहिती घेता येईल. ॲडमिशनबाबत इग्नूच्या www.ignou.ac.in या संकेतस्थळावर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नागपूर येथे इग्नूचे क्षेत्रीय केंद्र असून या अंतर्गत 14 जिल्हयात अध्ययन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. इग्नू मधील विविध अभ्यासक्रम यामध्ये सर्टीफिकेट / पीजी सर्टिफीकेट- 6 महिने, डिप्लोमा/ एडवांस डिप्लोमा/ पी.जी. डिप्लोमा – 1 वर्ष, स्नातक पदवी – 3 वर्ष, स्नातकोत्तर पदवी – 2 वर्ष यांचा समावेश आहे.

*इग्नू मधील विविध अभ्यासक्रमातील विषय – कृषी, संगणकशास्त्र, शिक्षण (BEd), ऊर्जा, आरोग्य, हॉस्पीटल व्यवस्थापन, पत्रकारीता, कायदेशीर अभ्यास, ग्रंथालय , व्यवस्थापन, पारंपारीक बीए, बीकॉम, बीएसी, समाजकार्य, ग्रामीण विकास, पर्यटन, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण, समुपदेशन, अशासकीय संस्था तसेच नोकरी कौशल्यावर अधारीत अनेक प्रमाणपत्र कोर्सेस उपलब्ध आहेत. यामधील काही अभ्यासक्रमांसाठी एससी व एसटी विद्यार्थ्यांना फक्त परिक्षा फी भरावी लागणार आहे. उर्वरीत सर्व अभ्यासक्रम मोफत आहेत.

*यांना होईल फयदा : इग्नू मधील विविध प्रमणपत्र अभ्यासक्रमांचा फायदा सर्वांनाच आहे मात्र विशेषकरून महिला गृहिणी, ग्रामीण युवक, दिव्यांग, सामाजिक व अर्थिक दृष्टया मागास घटकांमधील व्यक्ती, कैदी, नोकरी व कामाधंद्यात असणारे नागरिक यांना दुरस्थ शिक्षणामधून विविध अभ्यासक्रम पुर्ण करता येणार आहेत.

इग्नू कडून जिल्ह्यातील 4 गावांना दत्तक घेण्यात आले आहे. उन्नत भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात उच्च शिक्षण पोहचविण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. यामध्ये दुर्गम भागातील गावांची निवड करण्यात आली आहे. यात कुरखेडा तालुक्यातील नेहारपायली, आंबेझरी तर कोरची तालुक्यात नवरगाव, सल्हे गावाचा समावेश आहे. या ठिकाणी ते उच्च शिक्षणामधील सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

For more information contact to our website www.ignou.ac.in or 0712-2536999 or email on rcnagpur@ignou.ac.in