चंद्रपूर : पाणीप्रश्नासाठी मनसेचे आमदारांना निवेदन

पाणीप्रश्नासाठी मनसेचे आमदारांना निवेदन

वरोरा:-
वरोरा शहरात दूषित पान्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे, यासंदर्भात वरोरा-भद्रावती विधानसभेच्या आमदार प्रतिभा धानोरकर याना निवेदन देण्यात आले, गेल्या क्रितेक वर्षापासून वरोरा शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या जास्तच प्रमाणात जोर धरून आहे,नगर परिषदला वारंवार निवेदन देऊन एकच उत्तर मिळत ते म्हणजे या कामाकरिता आम्ही वारंवार सरकारला विनंती केली पन यामधे आम्हाला यश आले नाही, हा विषय कैबिनेट मधे ठेऊन त्यावर चर्चा करून त्याला स्वीकृती मिळेल तेव्हाच शहरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. ६५ कोटी रूपयाच्या या पानी प्रश्नाला आपन मंत्रालयात कैबिनेट मधे ठेऊन त्यास स्वीकृती मिळऊन शहराच्या या पानी प्रश्नाला नवजीवन द्यावी असे मनसे च्या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.