चंद्रपूर : पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर दि.28 जुलै : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि.29 जुलै 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांबाबत आढावा बैठक. दुपारी 1 वाजता वेकोली, म्हसाळा तुकुम येथील शेतजमीन भूसंपादित प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत आढावा बैठक. दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात वेकोली भटाळा गावाच्या पुनर्वसनाबाबत आढावा बैठक. दुपारी 2 वाजेपासून वेळ राखीव. सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

शुक्रवार दि. 30 जुलै 2021 रोजी सकाळी 9 वाजता नागपूर येथून सावली जि. चंद्रपूरकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता तहसील कार्यालय, सावली येथे आगमन व तालुक्यातील विकास कामासंदर्भात आढावा बैठक. दुपारी 12.30 वाजता सिंचाई विश्रामगृह सावली येथे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. दुपारी 2 वाजता सावली येथून गडचिरोलीकडे प्रयाण करतील.

शनिवार दि. 31 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व राखीव. सकाळी 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे तालुक्यातील विकास कामासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा. दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह सिंदेवाही येथे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. दुपारी 1.30 वाजता सिंदेवाही येथून ब्रह्मपुरीकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता ब्रह्मपुरी तालुक्यातील विकास कामासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा. सायंकाळी 4 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. सायंकाळी 5.30 ते 6.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. रात्री 6.30 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

सोमवार दि. 2 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता टसर टुरिझम कॉरिडोर आगरझरी ( ताडोबा) येथे टसर टुरिझम कॉरिडोर आगरझरी, ताडोबा प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 वाजता नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता नियोजन भवन येथे पत्रकार परिषद. सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील.