फ्रान्समधील जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी महास्वयंम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

फ्रान्समधील जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी महास्वयंम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 27 : जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2024 मध्ये फ्रांस (ल्योन) येथे होणार आहे. त्या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी देश, राज्य, विभाग, आणि जिल्हास्तरावर स्पर्धा घेतली जाणार आहे. याद्वारे गुणवान, कौशल्यधारक पात्र स्पर्धकाचे नामांकन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या चंद्रपूर जिल्हातील युवक-युवतींनी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

 

 

 

सदर स्पर्धा ही दर 2 वर्षानी होत असते. जगातील ही सर्वात मोठी व्यवसायीक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्ठता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुणांसाठी त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलपिंक खेळासारखीच आहे. या स्पर्धेमध्ये भारतातील प्रतिभा संपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्हातील युवक-युवतींनी विविध 52 क्षेत्रामध्ये होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://kaushalya.mahaswayam.gov.in/ या महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी करावी.

 

यापूर्वी 46 जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये 62 सेक्टरमधून 50 देशातील 10 हजार उमेदवार समाविष्ठ झाले असून ही स्पर्धा 15 देशात 12 आठवडयासाठी आयोजित करण्यात आली होती. यापूढील जागतिक कौशल्य स्पर्धा-2024 मध्ये फ्रांस (ल्योन) येथे आयोजित केली आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा-2024 साठी वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आला आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांचा जन्म 1 जानेवारी 2002 किंवा तदनंतरचा असावा. तसेच आडेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, क्लाउुड कंप्युटींग, सायबर सिक्युरिटी, डिजीटल कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0 इन्फारमेंशन नेटवर्क गॅबलिग, मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोट सिस्टीम इंटिग्रेशन ॲड वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्रासाठी उमेदवारांचा जन्म 1 जानेवारी, 1999 किंवा त्यांनतरचा असणे अनिवार्य आहे.

 

स्पर्धेसाठी येथील उमेदवारांना करता येईल नामांकन :

 

या स्पर्धेसाठी देश, राज्य, विभाग, आणि जिल्हापातळीवरून प्रतिभा संपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरीता सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एम.एस.एम.इ. टुल्स रुम्स, आय.आय.टी, सिपेट, तंत्रनिकेतन महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, आय.एच.एम/हॉस्पीटॅलिटी इंन्स्टिटयुट, कार्पोरेट टेक्निकल इन्स्टिटयूट, स्किल ट्रेनिग इंस्टिटयुट, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, खाजगी कौशल्य विद्यापीठ, इन्स्टिटयुट ऑफ ज्वेलरी मेकिंग इतर सर्व प्रशिक्षण संस्था, कला, वाणिज्य विज्ञान शाखेची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अधिनस्त सर्व व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्था, विविध आस्थापना आणि कारखाने यांच्याकडील विहित वयोमर्यादेतील इच्छुक प्रतिभा संपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन या स्पर्धेसाठी करता येईल.

 

स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच कळविण्यात येईल. या स्पर्धेत निवड झालेल्या उमेदवारांना वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन व सहाय्य महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्याकडून करण्यात येईल. इच्छुक पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/ या लिंकवर भेट देऊन नोंदणी करुन सहभाग निश्चित करावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.