नागरिकांच्या आरोग्यासाठी महानगरपालिकेतर्फे २८ बाह्यसंपर्क आरोग्य शिबीर

नागरिकांच्या आरोग्यासाठी महानगरपालिकेतर्फे २८ बाह्यसंपर्क आरोग्य शिबीर

चंद्रपूर, ता. २५ : शहरातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी चंद्रपूर शहर महानरपालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानअंतर्गत २८ बाह्यसंपर्क आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. २१ नोव्हेंबरपासून शिबिरांना प्रारंभ झाला असून, सात डिसेंबरपर्यंत हे शिबिर होत आहेत. आतापर्यंत पाच शिबीर पार पडले. यात शेकडो नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.

येत्या आठवड्यात आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आरोग्य शिबीर होणार आहेत. यात २६ नोव्हेंबर रोजी शेडमाके सभागृह महर्षी कर्वे वॉर्ड, हनुमान मंदिर चंद्रछाया मंगल कार्यालय महेश नगर, हनुमान मंदिर सपना टॉकीज जवळ जलनगर, शहिद भगतसिंग शाळा  भिवापुर वॉर्ड, २७ नोव्हेंबर रोजी टागोर शाळा विठ्ठल मंदिर, लुम्बिनी बौद्ध विहार माता मंदिर चौक, २९ नोव्हेंबर रोजी समस्काल दर्गा एकोरी वॉर्ड, सोहेल कुरेशी यांच्या घरी तुकुम तलाव, शालवन बौद्धविहार, दादमहल वॉर्ड, ३० नोव्हेंबर रोजी समाज मंदिर वैद्यनगर, डायमंड क्लब, प्रकाश नगर, प्रशिक बुध्द विहार, नगिनाबाग, गावंडे अंगणवाडी लालपेठ, गोपालकृष्ण मंदिर बालाजी वार्ड, १ डिसेंबर रोजी राम मंदिर, भानापेठ वार्ड, २ डिसेंबर रोजी तथागत बुध्द विहार नेहरुनगर, २ डिसेंबर रोजी हनुमान मंदिर डॉ. आंबेडकर नगर, २ डिसेंबर रोजी गौसिया मदरसा, रेहमतनगर, ३ डिसेंबर रोजी अष्टभुजा मंदिर, अष्टभुजा वार्ड, प्रेरणा बुध्द विहार रमानगर, ६ डिसेंबर रोजी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र ५, बाबुपेठ, ७ डिसेंबर रोजी हनुमानमंदिर, एकता चौक पोलीस लाईन, आदी ठिकाणी हे शिबिर होणार आहेत. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वनिता गर्गेलवार यांनी केले आहे.