गडचिरोली : देवलमरी येथे शिवसंपर्क अभियान! असंख्यांनी पक्षात प्रवेश केले शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान तेजीत

देवलमरी येथे शिवसंपर्क अभियान!
असंख्यांनी पक्षात प्रवेश केले
शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान तेजीत

अहेरी:- शिवसेनेच्या वतीने 12 जुलै पासून राज्यव्यापी शिवसंपर्क अभियान सुरू असून अहेरी विधानसभेत अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांच्या वतीने शिवसंपर्क अभियान तेजीत सुरू आहे.
शिवसेनेचे संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहसंपर्क प्रमुख विलास कोडाप यांच्या सहकार्याने अहेरी विधानसभेचे रियाज शेख व अहेरी उपजिल्हा प्रमुख अरुण धुर्वे, संघटक बिरजू गेडाम, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल येरणे शिवसैनिकांसोबत अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्र पिंजून काढीत आहेत.
सोमवार 19 जुलै रोजी अहेरी तालुक्यातील देवलमरी येथे शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले असून असंख्य कार्यकर्ते शिवसेना पक्षात प्रवेश केले.
प्रवेश करणाऱ्यामध्ये बोले मल्ला, मोडगा पोशा, आशा गौराम, बापू पानेम, संतोष पानेम,येरय्या व्येंकटी, विनोद येरय्या, प्रकाश येरय्या, पोटी मोडगा, शंकर मोडगा, मूलका कोडी, शंकर कोडी, समय्या कोडी, पूनम गौरारप्पा, गंगुबाई पानेम, बिचू पानेम, सरिता पानेम, व्येंकटी बानुबाई, रमेश बोडेंकी, सीनका येदुला, मनी शंकर आशा, व्यंकटेश मोडगा, शेवता मोडगा, राजूबाई मोडगा, शैलेश पानेम, चंद्रशेखर राऊत, सुजन ओडिला, बोनदुबाई पानेम, मोसम येथील करिमा मडावी, नामदेव मडावी, किरणताई सिडाम, गोपाल भाद्दीवार, सरिता भाद्दीवार आदी व असंख्यानी यावेळी शिवसेना पक्षात प्रवेश केले.
शिवसेनेचे रियाज शेख, अरुण धुर्वे, बिरजू गेडाम, दिलीप सुरपाम,महिला आघाडीचे तुळजाताई तलांडे, पौर्णिमा इष्टाम या पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे जंगी स्वागत करून अभिनंदन केले.

समस्या जाणून घेऊन सोडविण्याचे आश्वासन दिले
देवलमरी वासीयांचे समस्या जाणून घेऊन जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी, शिवसेना पक्ष गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांच्या हिताचा विचार करणारा पक्ष असून पक्षाचे विचार प्रत्येक गावोगावी, खेडोपाडी व घरोघरी पोहचविण्यासाठी शिवसंपर्क अभियान सुरू असल्याचे सांगून देवलमरी येथील मासेमारीचे व्यवसाय करणाऱ्यांना साहित्य सामुग्री उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या सोबत चर्चा करू असे आश्वासन दिले आणि कोरोनाला हद्दपार करण्यासाठी गावकऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावे असे रियाज शेख यांनी यावेळी आवाहनही केले.