गडचिरोली :राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा जोगीसाखरा प्रभारी सरपंच संदीप ठाकूर यांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदन मागणी.

जोगिसखरा ग्रामपंचायतला विशेष विकास निधी द्या

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा जोगीसाखरा प्रभारी सरपंच संदीप ठाकूर यांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदन मागणी.

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यामधील जोगीसाखरा ग्रामपंचायत मध्ये गेल्या पाच वर्षापासून निधीअभावी विकास कामे मोठ्या प्रमाणात खोळंबले असल्यामुळे आपल्या स्तरावरून जोगीसाखरा ग्रामपंचायतला विशेष विकास निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी आरमोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संदिप ठाकुर यांनी राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

गावाचा सर्वांगीक विकास व्हावा म्हणून शासनस्तरावरून विविध प्रकारचे विकास कामे ग्रामपंचायत हद्दीत केली जातात यात नाली बांधकाम अंतर्गत रस्ते, व पुलिया बाधकामाचे नियोजन शासन स्तरावर पाठविले जातात परंतु यात शासन स्तरावरून निधीची उपलब्ध केली जात नसल्याने जोगीसाखरा ग्रामपंचायतीचा विकास खुंटला आहे. आरमोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष तथा प्रभारी सरपंच संदिप ठाकुर यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडे निवेदनातून जोगीसाखरा ग्रामपंचायतला विकास कामे करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे.
यावेळी गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.