Chandrapur I शिवाजी चौक ते रेल्वे स्थानक पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व फुटपाथ तयार करावा. – सुजाण नागरिक मंचाची मागणी. 

शिवाजी चौक ते रेल्वे स्थानक पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व फुटपाथ तयार करावा. – सुजाण नागरिक मंचाची मागणी. 

सिंदेवाही येथील सिंदेवाही ते रेल्वे स्थानक पर्यंत अनेक शासकीय कार्यालये, बाजार समिती, न्यायालय, मार्केट, भाजी बाजार अशी अनेक दैनंदिन कामाची प्रतिष्ठान आहेत. हाच रस्ता पुढे पाथरी, सावली, गडचिरोली, आरमोरी या गावांसाठी मुख्य रस्ता आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ असते. सकाळ संध्याकाळ पायी फिरण्यासाठी याच रस्त्याचा वापर लोक करतात. त्यामुळे या रस्त्यावर फारच ताण येतो. पर्यायाने लोकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावर चालावे लागते, म्हणून या रस्त्याच्या रूंदीकरणाची फारच गरज आहे तसेच शिवाजी चौक ते रेल्वे स्थानक पर्यंत फुटपाथ ची आवश्यकता आहे. तरी या महत्वपूर्ण समस्येकडे शासनाने लक्ष द्यावे. अशी मागणी सुजाण नागरिक मंच लोनवाही-सिंदेवाही चे हरिभाऊ पाथोडे यांनी केले आहे.