गडचिरोली : शेतकऱ्यांचा धान पोहचला चक्क तहसील कार्यालयात

शेतकऱ्यांचा धान पोहचला चक्क तहसील कार्यालयात

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
संपर्क : ८२७५२२८०२०
(गडचिरोली जिल्हा)
आरमोरी : यावर्षीच्या रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यात धान पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले, त्यातच खरीप हंगामामध्ये खरेदी केलेला माल अद्यापही प्रशासनाने उचल न केल्यामुळे खरेदी विक्री सहकारी संस्थेला गोडाऊन ची कमतरता भासू लागली आहे दरम्यान धान विक्री करण्याची मुदत फक्त २ ते ३ दिवसावर येऊन ठेपली असल्याने शेतकऱ्यांचा धान घरी पडून आहे या बाबीची दखल घेत  गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी चक्क तहसील कार्यालयात आणल्याने तहसीलदार यांनी त्यांचाशी चर्चा करून पर्यायी गोडाऊन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
      शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड केली होती त्यातच उत्पादनही मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी एप्रिल व मे महिन्यात धान विक्री साठी खरेदी विक्री सहकारी संस्थेकडे ऑनलाइन नोंदणी केली असून गोडाऊनची कमतरता संस्थेला भासू लागल्याने शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यास अडचण निर्माण हॊत असून त्याचा त्रास शेतकऱ्यांना होत असल्याने दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आज १२ जुलै रोजी तहसील कार्यालयात ट्रॅक्टर भरुण धान विक्रीसाठी आणले व तहसीलदार कल्याण कुमार दहाट यांच्याकडे निवेदन देऊन गोडाऊन उपलब्ध करून प्रलंबित दोनशेच्यावरुण शेतकऱ्यांचे धान मुदतीच्या आत खरेदी करण्यात यावी अशी मागणी केली असता तहसीलदार कल्याण कुमार डहाट यांनी वरिष्ठांकडे चर्चा करून गोडाऊन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
यावेळी खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष मनोज मने, उपाध्यक्ष लक्ष्मन कानतोडे, व्यावस्थापक अक्षय माकडे, डॉ. सजय ठेगरे, ग्रेडर गोपाल ककटवार, अक्षय भोयर, राजु घोडाम, कार्तिक मातेरे, पुषोत्तम मैन्द, मच्छिद्र मेश्राम, देवराव ठाकरे, कांतीलाल वझाडे, ‌चद्रभान अक्षय गरफडे, निबेकर, अशोक गोहणे, बाजीराव सयाम, गिरीधर घोडाम यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.