चिमुर हद्दीतील मौजा रेनगाबोडी-जामणी जंगल शिवारामधील मोठ्या प्रमाणातील अवैध जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड

चिमुर हद्दीतील मौजा रेनगाबोडी-जामणी जंगल शिवारामधील मोठ्या प्रमाणातील अवैध जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड

एकुण १० अटक आरोपी व ०३ फरार आरोपीविरुध्द गुन्हा दाखल गुन्हयात ०६ चारचाकी, ३ दुचाकी व रोख १,२५,०००/- व इतर साहित्य असा एकुण २७,९०,०००/- रुपयाचा माल जप्त

पोलीस स्टेशन चिमुर ची कारवाई

दिनांक ०६/१०/२०२५ रोजी चिमुर पोलीसांना गोपनियरित्या माहिती मिळाली की, मौजा रेनगाबोडी व जामणी जंगल शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध जुगार अड्‌डा सुरु झालेला आहे. यावरुन चिमुर पोलीसांनी सदर ठिकाणी स्टॉफ व पंचासह धाड टाकुन रेड केली असता एका कापडाच्या तंबु मध्ये काही व्यक्ती ताश पत्तयावर हार-जित ची बाजी लावुन जुगार खेळतांना मिळुन आले. त्यापैकी आरोपी नामे (१) सुधीर पोहीनकर रा. जामनी, (२) रजतकुमार नागवंशी रा. छिंदवाडा (३) पांडुरंग रामाजी फलके रा. समुद्रपूर (४) अमन भोसले रा. सेलु (५) सुरज कोपरकर, (६) फकीरा काकरवार रा. सेलु (७) मंगेश गुडघे रा. कोरा (८) सुखदेव अवचट रा. समुद्रपुर (९) सचिन धोटे रा. समुद्रपुर (१०) नुमान कुरेशी रा. भद्रावती हे जागेवर मिळुन आले असुन आरोपी नामे (११) गोलु राऊत रा. समुद्रपुर (१२) जिवन सिडाम रा. जामणी व (१३) अनिल जाधव रा. शेगांव असे तिघे अंधाराचा फायदा घेवुन फरार झाल्याने एकुण १३ आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन चिमुर येथे जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहे.

सदर गुन्हयातील आरोपीकडुन एकुण रोख रक्कम १,२५,०००/- रु. तसेच ०६ चारचाकी वाहने व ०३ दुचाकी वाहने, चॉर्जीग बॅटरी, सतरंजी, एलईडी व इतर साहित्य असा एकुण २७,९०,०००/- रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री दिनकर ठोसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, चिमुर यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे चिमुर ठाणेदार पोनि श्री दिनेश लबडे यांचे नेतृत्वात सपोनि श्री अमोल बारापात्रे, पोअं सचिन सायंकार, अतुल ढोबळे, निलेश बोरकर, कुणाल दांडेकर, गणेश वाघ, हर्षल शिरकुरे, उमेश चरफे, रोहित तुमसरे, फाल्गुन परचाके, सौरभ महाजन, अविनाश राठोड सर्व पोलीस स्टेशन चिमुर यांनी केली आहे.