डेबूजी ब्रिगेडतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण / संत गाडगेबाबा अभिवादन कार्यक्रम 

डेबूजी ब्रिगेडतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण / संत गाडगेबाबा अभिवादन कार्यक्रम 

सिंदेवाही – डेबूजी युवा ब्रिगेड ,बहुजन समाज पार्टी व अनुज माल्स सिंदेवाहीच्या वतीने संत गाडगेबाबा स्मृतीदिनाप्रित्यर्थ राममंदिर चौक सिंदेवाही येथे आयोजित संत गाडगेबाबा अभिवादन कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्याना नोटबुक ,पेन व बिस्कीट पुडे आदी शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वितरण अतिथींच्या हस्ते नुकतेच करण्यात आले .

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सिंदेवाही नगर पंचायतचे उपाध्यक्ष मयूर सूचक होते .मुख्य अतिथी डेबूजी युवा ब्रिगेड सिंदेवाहीचे प्रभारी प्रा .भारत मेश्राम ,अनुज माल्स सिंदेवाहीचे विनोद काटेकर ,धोबी समाज महिला महासंघाच्या अध्यक्ष रजनी आष्टणकर,बहुजन समाज पार्टीचे शहर अध्यक्ष डा .रेवानंद बांबोळे व महाराष्ट धोबी समाज महासंघाचे अध्यक्ष प्रमोद सुरणकर यांची विचारमंचावर उपस्थिती होती .

यावेळी सर्वप्रथम प्रमुख अतिथींच्या हस्ते कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस दिपप्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले .

त्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक ,पेन व बिस्कीट पुडे आदी शैक्षणिक साहित्य व खाऊचे वितरण करण्यात आले .

याप्रसंगी डेबूजी युवा ब्रिगेडचे प्रा .भारत मेश्राम यांनी येत्या फेब्रुवारी 2023 रोजी संत गाडगेबाबा जयंतीदिनी शालेय विदयार्थ्यासाठी तालुकास्तरीय संत गाडगेबाबा जीवन परीक्षेचे आयोजन करून विजेत्या विदयार्थ्यांना रोख पुरस्कार ,प्रमाणपत्र व बक्षिसे देण्याचे जाहीर केले