पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा Ø रोजगार मेळाव्यात 22 उमेदवारांची प्राथमिक निवड

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा Ø रोजगार मेळाव्यात 22 उमेदवारांची प्राथमिक निवड

चंद्रपूर, दि. 13 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय महाविद्यालय मोरवा, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 9 डिसेंबर 2022 रोजी छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय महाविद्यालय मोरवा,येथे करण्यांत आले होते.

सदर मेळाव्यांचे उद्घाटन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांच्या हस्ते करण्यांत आले. याप्रसंगी राजमाता जिजाउु बहुउददेशिय प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाष ठोंबरे, श्रीमती वाघमारे, प्रा. दिलीप चौधरी, श्री. खरवडे आदी उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये ॲलेक्सी म्युचुअल बेनिफीट निधी लिमी.चंद्रपूर, ऑक्स फर्स्ट चंद्रपूर, इनोवसोर्स नागपूर व भारतीय जीवन बीमा निगमचे अधिकारी उपस्थित होते.

या मेळाव्यात जिल्हातील 91 उमेदवारांनी नोंदणी करण्यात आली होती. उमेदवारांनी पात्रतेनुसार वेगवेगळया उद्योजकांकडे मुलाखती दिल्या.संबंधीत उद्योजकांनी उमेदवारांना मार्गदर्शन करून 22 उमेदवारांची प्राथमिक निवड या मेळाव्यात करण्यात आली.

 

यावेळी सहायक आयुक्त श्री. येरमे यांनी उमेदवारांना आपल्या कौशल्याचा वापर रोजगार व स्वंयरोजगार मिळविण्यासाठी करावा, उद्योजकांनी जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दयावी असे आवाहन केले. राजमाता जिजाउु बहुउददेशिय प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाष ठोंबरे यांनी ग्रामीण भागातील उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या आयोजनाचा लाभ घ्यावा व या मेळाव्याच्या माध्यमातून मुंबई,पूणे येथील कंपन्यामध्ये रिक्त आलेल्या पदावर रोजगार प्राप्त करून घ्यावेत तसेच मेळाव्यामध्ये विविध महामंडळांनी सहभागी होवून आर्थिक योजनाचा लाभ घाव्या असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोरवा, छात्रविर राजे संभाजी प्रशासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास ढोणे तर आभार शैलेश भगत यांनी मानले.