सार्वजनिक आरोग्य विभागाचे जाहीर आवाहन..

सार्वजनिक आरोग्य विभागाचे जाहीर आवाहन..

 

गडचिरोली, दि.13: भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सन 2025 पर्यंत या देशातुन क्षयरोग (टीबी) हद्दपार करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. व ते गाठण्यासाठी नागरिकांचा व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान या अंतर्गत समाजातील विविध घटक म्हणजेच दानशुर व्यक्ती, राजकीय व्यक्ती, स्वयंसेवी संस्था (NGO) सोसायटया, इतर कार्यालय व संस्था, औद्योगिक संस्था, राजकीय संस्था या निक्षयमित्र म्हणून आवश्यकतेनुसार पोषक आहार, तपासण्याच्या खर्च, उपचाराकरीता येणारा खर्च किंवा गंभीर आजारातून बरे झालेल्यांचे पुनर्वसन या सर्वांना सहाय्य दिले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील दानशुर व्यक्ती, राजकीय व्यक्ती, स्वयंसेवी संस्था (NGO) सोसायटया, इतर कार्यालय व संस्था, औद्योगिक संस्था, राजकीय संस्था यांना गडचिरोली जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेअंतर्गत उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांना निक्षय मित्र म्हणून सहभाग करुन मदतीचा हात यावा अशी नम्र विनंती. निक्षय मित्र नोंदणी करण्याकरीता https://reports.nikshay.in/FormlO/DonorRegistration या संकेतस्थळावर त्याचे नाव नोंदणी करावे. नाव नोंदणीनंतर स्थानिक जिल्हा क्षयरोग अधिकारी यांना संपर्क करण्यासाठी तपशील उपलब्ध होतो तसेच त्यांच्या कार्यद्यक्षेत्रातील उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांची व मदत घेण्यास इच्छुक असणाऱ्या क्षयरुग्णांची यादी उपलब्ध आहे. एक निक्षय मित्र एक किंवा अनेक क्षयरुग्णांना दत्तक घेऊ शकतात व कमीत कमी सहा महिने व जास्तीत जास्त 3 वर्ष मदत करु शकतात क्षयरुग्णांना पोषक आहार देण्याकरीता प्रति महिना/प्रति रुग्ण सुमारे रु.300/- ते 500/- रु. इतका खर्च येतो.

1) निक्षय मित्राचे नाव 2) मोबाईल नं., 3) ईमेल आयडी 4)पत्ता Helpline No.1800116666 अधिक माहितीसाठी संपर्क गणेश खडसे 9423398322 वेळ 09.30 ते 06.15 असे जिल्हा क्षयरोग अधिकारी, गडचिरोली डॉ. विद्यानंद व्हि. गायकवाड यांनी कळविले आहे.