सिंदेवाही बास्केटबॉल अकॅडमी च्या खेळाडूंची विद्यापीठ स्तरावर निवड

सिंदेवाही बास्केटबॉल अकॅडमी च्या खेळाडूंची विद्यापीठ स्तरावर निवड

सिंदेवाही:- स्थानिक सिंदेवाही येथील सिंदेवाही बास्केटबॉल अकॅडमी (एस. बी. ए.) च्या खेळाडूंनी पुन्हा एकदा आपले नाव लौकिक केले आहे. नुकताच पार पडलेल्या अंतर महाविद्यालयीन पुरुष बास्केटबॉल स्पर्धेत नामदेव वडेट्टीवार महाविद्यालय सिंदेवाही च्या संघाने तृतीय स्थान पटकावले होते. आता याच संघातील वैभव सोनकर व सुरज अष्टकार या खेळाडूंची निवड डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ,संभाजीनगर (औरंगाबाद) येथे होणाऱ्या अश्वमेध व वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी बास्केटबॉल स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाचे नेतृत्व करण्याकरिता झालेली आहे.तसेच रोहित सोनुले याची सुद्धा वरील स्पर्धेकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणेरे या संघात नागपूर झोन मधून निवड झालेली आहे.

निवड झालेल्या खेळाडूंनी आपले विजयाचे श्रेय आई-वडील व (एस. बी. ए.) प्रशिक्षक निनाद शेंद्रे सर व मार्गदर्शकांना दिलेले आहे.निवड झालेल्या सर्व खेळाडूंवर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.