लाखांदूर तहसील कार्यालयात अंतिम मतदार यादी निरीक्षणासाठी उपलब्ध

लाखांदूर तहसील कार्यालयात अंतिम मतदार यादी निरीक्षणासाठी उपलब्ध

भंडारा, दि. 30 : जिल्हा परिषद भंडारा व लाखांदूर पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादी तयार असल्याची सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 13 नुसार प्रारूप मतदार यादी यासंबंधीच्या प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करून भंडारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत लाखांदूर पंचायत समितीची अधिप्रमाणित, अंतिम मतदार यादी नागरिकांच्या पाहणीसाठी व निरीक्षणासाठी तहसील कार्यालय लाखांदूर येथे उपलब्ध आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांकरीता मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 26 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय लाखांदूर पंचायत समिती लाखांदूर व मतदान केंद्राच्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे ती नागरिकांना पाहणीसाठी उपलब्ध आहे, असे तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी अखिलभारत आर. मेश्राम यांनी कळवले आहे.