सिंदेवाही पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणाली वर शंका – मिथुन मेश्राम

सिंदेवाही पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणाली वर शंका – मिथुन मेश्राम

सिंदेवाही तालुक्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
घरफोड्या, दुकान फोडी, वाहन चोरी, बलात्कार, हत्या, जनावरांची तस्करी, कोंबडा बजार ,सुगंधित तंबाखाची अवैध विक्री, अवैध दारू विक्री, गांजा विक्री, जुगार, सट्टापट्टी अशा अनेक गुन्ह्यांचे मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
      सिंदेवाही तालुक्यात एकाच रात्री दोन चार चोरी होणं म्हणजे आता लोकांना पन नवलं वाटतं नाही. 
मस्जिद, मंदिर मधे सुद्धा चोरट्यांनी चोरी करण्यास कसर सोडली नाही. चोरांची मेहनत अशी असते कि सिंदेवाही पोलिस चोरट्यांना पकडू शकत नाहीत. 
      आता तर चोरट्यांनी हद पार केली आहे. शासकीय कार्यालयाचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. आणि अशा भागात हा प्रयत्न केला आहे. की त्या परिसरात पोलीसांचे तिनं तिनं कॅमेरे लावलेले आहेत.
     एखाद्या चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी सिंदेवाही पोलिस स्टेशनमध्ये गेले तर तक्रार कर्त्यांना आरोपींची वागणुक देवुन हाकलून लावतात सध्या असा प्रकार सुरू आहे.
      सिंदेवाही तालुक्याचा ठिकान असुन पोलिस स्टेशन सिंदेवाही ला पोलिस निरीक्षक अधिकारी यांचा दर्जा असतांना गेल्या चार वर्षांपासून सहाय्यक पोलीस निरिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू आहे. 
    सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या खांद्यावर जबाबदारी असल्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात वाढ होत चालल्याचा अंदाज दिसुन येत आहे. 
      त्यामुळे पोलिस निरीक्षक अधिकारी यांची पोलिस स्टेशन सिंदेवाही ला नियुक्ती करून वाढत्या गुन्हेगारीवर लवकरात लवकर आळा घालावा. अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माजी युवासेना जिल्हा उपप्रमुख ( ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र ) मिथुन मेश्राम यांनी शोसलमिडीया द्वारे केली आहे.