ओबीसी महामंडळाची एकरक्कमी परतावा योजना Ø थकबाकीदार लाभार्थ्यांना लाभ घेऊन कर्जमुक्त होण्याचे आवाहन

ओबीसी महामंडळाची एकरक्कमी परतावा योजना Ø थकबाकीदार लाभार्थ्यांना लाभ घेऊन कर्जमुक्त होण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.4 नोव्हेंबर: ओबीसी थकीत कर्ज प्रकरणात महामंडळाच्या थकीत लाभार्थ्यांसाठी संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्याची सुधारित एकरक्कमी परतावा ओटीएस योजना दि. 31 मार्च 2023 पर्यंत राबविण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.

त्याअनुषंगाने महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे महाराष्ट्र राज्य, इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.