चंद्रपूर जिल्ह्यातील “आर ओ” मशिन्स च्या देखभालसाठी निधी द्या आ.सुधीर मुनगंटीवार यांचा अधिकाऱ्यांशी संवाद

चंद्रपूर जिल्ह्यातील “आर ओ” मशिन्स च्या देखभालसाठी निधी द्या

आ.सुधीर मुनगंटीवार यांचा अधिकाऱ्यांशी संवाद

मुंबई, ता.२६:. चंद्रपूर जिल्ह्यातील २७८ गावांतील पाणी फ्लोराईडयुक्त आहे. सद्यःस्थितीत पाणीपुरवठा करीत असताना त्याचा दर्जा सांभाळणे महत्वाचे असून जिल्ह्यात पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत वाटण्यात आलेल्या जलशुद्धीकरण आणि डिफ्लोरिडेशन संयंत्राच्या वार्षिक देखभालीकडे गांभीर्याने लक्ष द्या, आणि निधी उपलब्ध करून द्या अशा सूचना लोकलेखा समितीचे अध्यक्ष माजी अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी आज दिल्या. विधानभवन येथे आज पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांच्यासह वित्त विभागातील अधिकाऱ्यांशी त्यांनी चंद्रपूर जिल्हयातील या विषयावर बैठकीचे आयोजन करून चर्चा केली.
यावेळी बोलताना श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, कोळसा खाणी, फ्लो राईड आणि वीज निर्मिती केंद्रांतून निघणारी राख यामुळे दुषित पाण्याचे प्रमाण वाढले. पर्यायाने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला. यासाठी मार्च २०१८ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनतेला शुद्ध पाणी मिळावे यासाठी शासन मार्फत आर ओ संयंत्र बसविण्यात आले.परंतु पहिल्या वर्षानंतर देखभाल ठीक नसल्यामुळे अडचणी येऊ लगल्या. यावर तोडगा काढण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानभवन येथे अधिकाऱ्यांना बोलावून आढावा घेतला, व मार्गदर्शक सूचना दिल्या. पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजना वेळेत पुर्ण होत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. आर ओ मशीन च्या देखभालीचा विषय लवकरच मार्गी लागेल असे आश्वासन सचिव जयस्वाल यांनी दिले.
यावेळी वित्त विभागाच्या उपसचिव शोभा मत्रे, प्रवीण पुरी, चंद्रपूर ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी गिरीश वारासागडे, अनुष्का दळवी, प्रसाद स्वामी आदी अधिकारी उपस्थित होते.