जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखाच्या वर

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखाच्या वर

चंद्रपूर, दि. 6 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दि. 23 मार्च 2020 पासून कोविड रुग्ण शोध मोहिमेला सुरुवात झाली होती. जिल्ह्यात पहिला रुग्ण 2 मे 2020 रोजी आढळून आला. तेंव्हापासून 4 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखाच्या वर गेली आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोनाची पहिली लाट दि. 15 डिसेंबर 2020 पर्यंत होती. पहिल्या लाटेमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 31200, कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 30774 तर कोविड-19 मुळे मृत्यूंची संख्या 426 होती. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट दि. 8 मार्च 2021 ते 15 जून 2021 या कालावधीपर्यंत होती. या लाटेमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 57657, कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 56540 तर कोविड-19 मुळे 1117 जणांचे मृत्यू झाले.

जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट दि. 1 जानेवारी 2022 ते 15 फेब्रुवारी 2022 या कालावधीपर्यंत होती. या लाटेमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10096, कोरोनामुक्त रुग्ण 10072 तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 24 होती. सद्यस्थितीत कोरोना हळूहळू वाढत असून 1 जून 2022 पासून पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 1080, कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 974 तर 4 मृत्यू झाले आहेत.

जिल्ह्यात सुरवातीपासून तर 4 सप्टेंबर 2022 पर्यंत कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्या वर गेली आहे. यामध्ये आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण 1 लक्ष 64, कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 98379 तर 1571 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात झालेले लसीकरण : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 16 जानेवारी 2021 पासून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली आणि त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या लाटेमध्ये रुग्णांचे संस्थेत भरती होण्याचे प्रमाण कमी झाले तसेच मृत्यूंची संख्यासुद्धा कमी झाली आहे. जिल्ह्यात कोविड लसीकरणास पात्र लाभार्थ्यांची एकूण संख्या 18 लक्ष 22 हजार 764 आहे. यापैकी 17 लक्ष 27 हजार 149 (94.75 टक्के) नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोज, 14 लक्ष 67 हजार 702 नागरिकांना (80.52 टक्के) दुसरा डोज तर 1 लक्ष 71 हजार 134 पात्र लाभार्थ्यांना कोविड लसीकरणाचा प्रिकॉशन डोज देण्यात आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.