लंपी आजारापासून करा गुरांचे संरक्षण – पुशसंवर्धन उपायुक्तांचे आवाहन

लंपी आजारापासून करा गुरांचे संरक्षण – पुशसंवर्धन उपायुक्तांचे आवाहन

भंडारा, दि. 1 : राज्यात जळगाव जिल्हा, अहमद नगर, अकोला व शेजारच्या राज्यात देखील अनेक ठिकाणी लंपी या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला असून भंडारा जिल्ह्यातील पशूंना हा रोग हाऊ नये म्हणून प्रतिबंधक उपाययोजना म्हणून सर्व शेतकऱ्यांनी लंपी रोगाच्या प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे जेणे करून लंपी रोगापासून बचाव करता येईल.

मागील वर्षी लंपीची साथ अनुभवलेल्या शेतकऱ्यांनी भयभीत होण्याचे कारण नाही. सर्व पशुपालकांनी गुरांचे स्वच्छ ठेवावे. गोठ्यामध्ये डास होणार नाही यासाठी उपाययोजना करावी. आपल्या आजारी गुरांना कळपातून वेगळे करून विलीगीकरण करावे. रोगाचा प्रचार करणाऱ्या किटकांवर सायपर मेथ्रीन रसायनांची फवारणी करणे तथा गोठ्यांची फवारणी करवून घेऊन रोगावर आळा घालण्यास उपाययोजना करावी.

या आजाराची लक्षणे खालील प्रमाणे आहे. गाय व म्हैश यांना हलका ताप येणे हा ताप दोन तीन दिवस राहतो शरीरावर सर्वत्र घट्ट गाठी येतात व कालांतराने पिकून फुटतात व त्या ठिकाणी खोल भाग निर्माण होतो. नाका भोवती तसेच घश्यात व श्र्वास नलिकेत देखील फोडे येतात. दुध देण्याचे प्रमाण घटते व योग्य वेळी उपचार न झाल्यास प्रकृती सेकंडरी ईनफेक्शन मुळे खालावते. त्यामुळे शेतकऱ्यांनी असी लक्षणे दिसताच नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त वाय.एस.वंजारी यांनी केले आहे.