महामंडळामार्फत प्रशिक्षण योजना सुरू

महामंडळामार्फत प्रशिक्षण योजना सुरू

चंद्रपूर, दि. 13 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ‌‌‌ मर्यादित मार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील कुटुंबाची सामाजिक आर्थिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावे व त्यांना पाहिजे त्या व्यवसायाचे प्रशिक्षण करिता मुख्यालयाकडून चंद्रपूर जिल्ह्यासाठी 200 प्रशिक्षणार्थीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

त्याकरिता इच्छुक अर्जदाराने महामंडळाच्या विहित नमुन्यात जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे अर्ज सादर करावा.

अर्जासोबत लागणारी कागदपत्रे : अर्जदारांच्या जातीच्या दाखला सक्षम अधिकारी त्यांच्याकडून घेतलेला असावा, अर्जदाराच्या  कुटुंबाच्या उत्पन्नाच्या दाखला (उत्पन्न मर्यादा 3 लाखापर्यंत तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा, नुकताच काढलेला पासपोर्ट साईज फोटोच्या दोन प्रती जोडाव्यात, राशन कार्डच्या झेरॉक्स प्रति, आधार कार्ड झेरॉक्स प्रति, मतदान कार्ड, मोबाईल क्रमांक आधार कार्ड लिंक, अर्जदारांच्या शैक्षणिक दाखला,

प्रशिक्षणार्थी मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील  असावा. प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा. प्रशिक्षणार्थी चे वय 18 ते 50 वर्षे असावे. प्रशिक्षणार्थीने यापूर्वी शासनाच्या महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेच्या लाभ घेतलेला नसावा. एका कुटुंबातील एकाच व्यक्ती सदर योजनेच्या लाभ घेता येईल.  प्रशिक्षणार्थीचे आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्याच्या तपशील सादर करावा, असे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.