पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा एकात्म मानववादाचा विचार जगासाठी आदर्शवत : आ. सुधीर मुनगंटीवार

पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा एकात्म मानववादाचा विचार जगासाठी आदर्शवत : आ. सुधीर मुनगंटीवार

भारतरत्न श्रध्येय अटलबिहारी वाजपेयी आणि देशगौरव पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे लोककार्य व निरपेक्ष समाजसेवा करण्याची वृत्ती या मागील मूळ वैचारिक बैठक म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा एकात्म मानववाद आहे, पंडितजीनी शेवटच्या माणसाच्या कल्याणाचा जो विचार समाजात रुजविला आहे तो अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या 105 व्या जयंती निमित्त भाजपा चंद्रपुर जिल्हा शाखेतर्फे आयोजित संवाद सेतु मध्ये आ. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, भारत देश हा आपला परिवार आहे भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजविणयासाठी पंडितजीनी आपले अवघे आयुष्य खर्ची घातले.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानववादाच्या मंत्राच्या प्रेरणेतुन पंतप्रधान नरेंदभाई मोदी यांनी सबका साथ सबका विकास चा नारा दिला. गोरगरीबांसाठी अनेक योजना राबविल्या .उज्वला गैस योजना, आयुष्यमान भारत योजना , स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाची योजना,स्टैंड्अप योजना ,स्टार्ट अप योजना , जनश्री विमा योजना अशा अनेक योजना त्यांनी अमलात आणल्या. भाजपच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपापल्या भागात प्रत्येक नागरिकापर्यन्त या योजनांची माहिती पोहचविणे आवश्यक आहे.कोरोना काळात लॉकड़ाऊन दरम्यान पंतप्रधान नरेंदभाई मोदी यांनी गोरगरीबांसाठी पैकेज जाहिर करत त्याची अंमलबजावणी केली. हा लोककल्याणकारी विचार पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रेरणेतुन साकारला आहे, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
आज या देशात 2500 पेक्षा जास्त राजकीय पक्ष आहेत. एकमात्र भारतीय जनता पार्टी चिखलात खुलून दिसणाऱ्या कमळप्रमाणे खुलून दिसते. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानववादाच्या विचारांचे ते फलित आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा हा विचार या देशासाठीच नव्हे तर जगासाठी आदर्शवत आहे. आज त्यांच्या जयंती दिनी त्यांच्या विचारांचा अंगीकार हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल , असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.