17 ते 20 ऑगस्ट दरम्यान पंडीत दीनदयाल उपाध्‍याय ऑनलाईन रोजगार मेळावा

17 ते 20 ऑगस्ट दरम्यान पंडीत दीनदयाल उपाध्‍याय ऑनलाईन रोजगार मेळावा

भंडारा, दि. 18: जिल्‍हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता,मार्गदर्शन केंद्र, मार्फत स्वातंत्र्याचा अमृत

महोत्सवानिमित्त “पंडीत दीनदयाल उपाध्‍याय ऑनलाईन रोजगार मेळावा” दिनांक 17 ते 20 ऑगस्टपर्यंत आयोजीत केला आहे. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात 101 पदे असून https://forms.gle/VUksBzUbakHmsdvA9 लिंकवर जावून उमेदवारांनी अर्ज भरावा. अर्ज भरण्याची प्रक्रिया सोबत दिलेली आहे.

या विभागाचे https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेब पोर्टल ओपन करावे, नोकरी साधक (Job Seeker) म्हणून आपल्या युजरनेम व पासवर्ड चा वापर करून लॉगीन करावे, पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर मध्ये भंडारा ऑनलाईन रोजगार मेळाव्याची निवड करावी, व्यु वॅकनसी (View Vacancies) या बटण वर क्लिक करावे, उपलब्ध रिक्तपदावरुन एक अथवा त्या पेक्षा जास्त पदांना अप्लाय (Apply) करावे असे, सहाय्यक आयुक्त जिल्‍हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता,मार्गदर्शन केंद्र सुधाकर झळके यांनी कळविले आहे.