स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी 28 मार्च पर्यत अर्ज सादर करावे 

स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी 28 मार्च पर्यत अर्ज सादर करावे 

       भंडारा,दि.9: सन 2023-24 या कालावधीमधील भारतरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अनुसूचित जाती व नवबैध्द घटकांतील विद्यार्थ्यांचे अर्ज 28 मार्च,2024 पर्यत स्विकारण्याची मुदत देण्यात आली आहे.

         तरी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांचे आवश्यक कागदपत्रे जात प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र,उत्पन्न दाखला,आधार कार्ड,10 वी 12 किंवा पदवी परिक्षेचे गुणपत्रक,महा.बोनाफाईड सर्टिफिकेट,बॅक खाते आधार संलग्न केल्याचा पुरावा,स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्रे,विद्यार्थी जेथे राहतो.त्याबाबतचा पुरावा खाजगी वसतिगृह,भाडे करारनामा इत्यादी,महाविद्यालयाचे उपस्थिती असल्याचे प्रमाणपत्र आदी,इत्यादी कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण विभाग,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,सिव्हिल लाईन,जिल्हा परिषद,चौक,भंडारा या कार्यालयात 28 मार्च,2024 पर्यत अर्ज सादर करावे.असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण विभागाचे बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.