भंडारा येथे सायकल रॅली उत्साहात

भंडारा येथे सायकल रॅली उत्साहात

भंडारा, दि. 12 : जिल्हा प्रशासन भंडारा व पोलीस प्रशासन भंडारा तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी सहा वाजता रेल्वे मैदान येथून दहा किलोमीटर महा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने सायकल रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या प्रमुख हस्ते करण्यात आले असून कार्यक्रम प्रसंगी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी,पोलीस अधीक्षक भंडारा जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती आशा मेश्राम , मनोज पंधराम क्रीडा अधिकारी, अनिकेत भारती, अपर पोलिस अधीक्षक, रीना जनबंधु मैडम, उपविभागीय अधिकारी, पौनी, संजय पाटिल, उप विभागीय अधिकारी, जयवंत चव्हाण, पोलिस निरिक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, प्रदीप पुल्लरबार, पोलिस निरिक्षक, भंडारा, शिवाजी कदम, पो. निरिक्षक, वाहतुक शाखा, नितिनचंद्र राजकुमार, भोजराज चौधरी क्रीडा मार्गदर्शक, मंगेश गुडधे, क्रीडा मार्गदर्शक तसेच सायकल क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.