एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत जागतिक आदिवासी दिन साजरा.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत जागतिक आदिवासी दिन साजरा.

भंडारा, दि. 10 : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व जागतिक आदिवासी दिनानिमित्त काल मंगलम सभागृह येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आदिवासी दिनानिमीत्त आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे नृत्य स्पर्धा, देशभक्ती पथनाटय व प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन येथे करण्यात आले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांनी शहरातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या महारलीचे आयोजन केले होते. जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कदम, भंडारा हे होते. प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी भंडारा रवींद्र राठोड, तहसीलदार भंडारा अरविंद हिंगे, कृषी विकास अधिकारी भंडारा राजेश पाडवी, मुख्य संघटक आफ्रोट संघटना जगदीश मडावी, जिल्हा अध्यक्ष आफ्रोट संघटना सोपचंद सिरसाम, अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी परिषद युवा शाखा भंडारा विनोद वटटी, शहर अध्यक्ष गिरीश कुंभरे तसेच आश्रम शाळेतील विद्यार्थी, वसतीगृहातील विद्यार्थी , शिक्षक व आदिवासी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व आध्यक्रांतीकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी आपल्या भाषणात जगदीश मडावी यांनी आदिवासी संस्कृती जोपासणे हे आदिवासी समाजाचे कर्तव्य आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून आदिवासी विध्यार्ध्यानी स्पर्धा परीक्षेकडे विशेष लक्ष द्यावे व अभ्यासाने सर्वांगीण विकास साधावा. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी हर घर झेंडा लावून राष्ट्रीय उत्सव साजरा करावा. तसेच आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशिल असल्याचे आश्वासन दिले.

आश्रमशाळेतील इयता 10 वी व 12 वी प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी संदीप कदम व प्रकल्प अधिकारी नीरज मोरे तसेच आदिवासी संघटना पदाधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आश्रम शाळेतील विद्यार्थाच्या नृत्य स्पर्धा घेण्यात आली. नृत्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नृत्य स्पर्धकांना प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस देण्यात आले. सहभागी सर्व शाळांना प्रोत्साहन पर बक्षीस प्रकल्प कार्यालयामार्फत देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांनी केले. सुत्रसंचालन प्राथमिक मुख्याध्यापक कमलेश सार्वे व प्राथमिक मुख्याध्यापक शेंडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अधीक्षक तवाडे यांनी मानले सदर कार्यक्रमामध्ये आदिवासी विद्यार्थी सघंटना युवा शाखा, आफ्रोट संघटना यांनी सक्रीय सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सहकार्य केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रकल्प कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.