‘महाआवास’ अभियानात जिल्ह्यात उत्कृष्ट काम

‘महाआवास’ अभियानात जिल्ह्यात उत्कृष्ट काम

  • लाखांदूर तालुका प्रथम
  • पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार

भंडारा,दि.17:- सर्वांसाठी घरे या धोरणाअंतर्गत महाराष्ट्र शासनाने ‘महाआवास’ अभियान राज्यभरात राबविण्यास सुरुवात केली असून महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत भंडारा जिल्ह्यात उत्कृष्ट काम झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजनेत लाखांदूर तालुका जिल्ह्यात प्रथम आहे. पवनी व्दितीय तर लाखनी तालुका तृतीय क्रमांकावर आहे.

पुरस्कार विजेत्यांना पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी संदीप कदम तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, प्रकल्प संचालक डॉ. संघमित्रा कोल्हे यांचे उपस्थितीत महाआवास जिल्हास्तरीय पुरस्कार व विशेष पुरस्कार वितरण करण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्यपुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम क्रमांक लाखांदूर तालुका गटविकास अधिकारी गजानन पाडुरंग अगर्ते, व्दितीय क्रमांक पवनी तालुका गटविकास अधिकारी प्रमिला लक्ष्मण वाळुज व प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तृतीय क्रमांक लाखनी तालुका गटविकास अधिकारी डॉ. शेखर बाळासाहेब जाधव तसेच राज्यपुरस्कृत आवास योजनेत तृतिय क्रमांक भंडारा तालुका गटविकास अधिकारी नुतन सावंत यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेत सर्वोत्कृष्ट क्लस्टर प्रथम क्रमांक लाखनी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राजेंद्र गणेश कानडे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता दुर्गेश पंचबुधे, व्दितीय क्रमांक लाखांदूर तालुका स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैलेश देवराव रंगारी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता महेश मुरतेली, तृतीय क्रमांक पवनी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रशांत नारायण बागडे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अक्षय तलमले यांचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांत समावेश आहे.

राज्यपुरस्कृत आवास योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट क्लस्टर प्रथम क्रमांक पवनी तालुका स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक रंजित दानाजी भानारकर, प्रदिप मुरलीधर पर्वतकर,  ग्रामीण गृहनिर्माण अभियंता रामरतन वैद्य, व्दितीय क्रमांक भंडारा तालुका स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पुष्पा देविदास पडोळे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता कुणाल राऊत, तृतीय क्रमांक लाखांदूर तालुका स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राजेश जगन्नाथ हेमने , ग्रामीण गृहनिर्माण अभियंता प्रफुल खोब्रागडे हे पुरस्काराचे मानकरी ठरले.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम क्रमांक आमगाव ता. पवनी सरपंच रेखा धर्मेद्र तांडेकर, व्दितीय क्रमांक सेंद्री (बु) ता. पवनी सरपंच पाडुरंग मरगडे, तृतीय क्रमांक मुर्झा ता. लाखांदूर सरपंच नंदकिशोर देवाजी मंडाले यांना पुरस्कार प्राप्त झाला.

राज्यपुरस्कृत आवास योजनेत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम क्रमांक दिघोरी ता. लाखनी सरपंच दुर्गा गजानन निरगुडे, व्दितीय क्रमांक सानगाव ता. साकोली सरपंच विलास गवळु मोहनकर, तृतीय क्रमांक बेटाळा ता. मोहाडी सरपंच रामसिंग चंदनसिंग बैस यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट कर्ज देणारी वित्तीय संस्था प्रथम क्रमांक बँक ऑफ इंडिया आंधळगाव, व्दितीय क्रमांक बँक ऑफ इंडिया मोहाडी, तृतीय क्रमांक स्टेट बँक ऑफ इंडिया जांब ता. मोहाडी तर राज्यपुरस्कृत आवास योजनेत सर्वोत्कृष्ट कर्ज देणारी वित्तीय संस्था प्रथम क्रमांक मैत्री महिला समुह बचत गट दिघोरी ता. भंडारा, व्दितीय क्रमांक कल्पतरु महिला बचत गट जैतपूर ता. लाखांदूर, तृतीय क्रमांक आदिवासी महिला समुह बचत गट खुर्शिपार ता. भंडारा यांना प्रदान करण्यात आले.

महाआवास अभियान उत्तम कामगिरीकरिता विशेष पुरस्कार गट विकास अधिकारी साकोली उमेश मधूकर नंदागवळी, गट विकास अधिकारी मोहाडी पल्लवी वसंतराव वाडेकर, गट विकास अधिकारी तुमसर धिरज भालचंद्र पाटील, ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील बी.एस. तुरस्कर, तृप्ती मधुकर चव्हान, श्री. चकोले, श्री. मडामे यांना पुरस्कार देण्यात आले.