कृषि यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यात उत्पादक/विक्रेते यांची सुचि(Empanelment)तयार करण्यात येणार.

कृषि यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यात उत्पादक/विक्रेते यांची

सुचि(Empanelment)तयार करण्यात येणार.

गडचिरोली, दि.29: सद्यस्थितीत राज्यात कृषि यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण प्रकल्प, राष्ट्रीय फलोद्यान अभियान (MIDH), राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, पोकरा ई. योजनेच्या माध्यमातून कृषि यांत्रिकीकरण या घटकासाठी शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या यंत्रे/ अवजारांसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे अंमलबजावणी करून अनुदान देण्यात येत आहे.

केंद्र पुरस्कृत योजनांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कृषि आयुक्तालय स्तरावर उत्पादकांची/ व त्यांचे अधिकृत विक्रेत्यांची सुचि (Empanelment) करण्यासाठी offline प्रस्ताव मागविण्यात येत आहे. यास्तव सादर करावयाच्या अर्जाचा नमुना, अटी व शर्ती, करारनामा, ज्या यंत्रे/औजारांसाठी Empanelment करावयाची आहे त्याची यादी ई. तपशील कृषि विभागाच्या(http://www.krishi.maharashtra.gov.in) संकेतस्थळावर उपलब्ध करवून देण्यात येत आहे. ज्या उत्पादकांचा या प्रक्रियेद्वारे अनुदानावर पुरवठा करण्यासाठी पात्र सुचिमध्ये समावेश करण्यात येईल त्यांचेमार्फत पुरवठा होणाऱ्या औजारांनाच अनुदान अनुज्ञेय राहील.

सदर प्रक्रियेसाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत २०.०८.२०२२ आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे (http://www.krishi.maharashtra.gov.in)संकेतस्थळावर भेट दयावी व सदर प्रस्ताव प्रत्यक्षरित्या कृषि उपसंचालक (किटकनाशके व औजारे,गुनि-५),निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग, कृषि आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत, पुणे येथे सादर करावे, असे कृषि संचालक (नुवगुनि) कृषि आयुक्तालय पुणे दिलीप झेंडे यांनी कळविले आहे.