बाल दिवसाचं औचित्य साधून ‘अल्ट्रा झकास’ घेऊन येत आहे बालकांसाठी ‘बर्फाची राणी’ चित्रपट!

बाल दिवसाचं औचित्य साधून ‘अल्ट्रा झकास’ घेऊन येत आहे बालकांसाठी ‘बर्फाची राणी’ चित्रपट!

मुंबई: पृथ्वीतलावर जगत असताना काय चांगलं आणि काय वाईट ही समजूत कोवळ्या वयात जर मुलांच्या अंगी आली, तर माणसाची माणुसकी पृथ्वीवर कायम टिकून राहिल. म्हणूनच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म आणि बाल दिवसाचं औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०२३ रोजी लहान मुलांना माणूसपन शिकवणारा हॉलिवूडचा अॅनिमेटेड चित्रपट ‘बर्फाची राणी’ अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येत आहे.

चित्रपटाची कथा एका मोठ्या राज्यातील राजा, जादूगर आणि बर्फात बंदिस्त झालेली शापित राणी यांच्या भोवती फिरते. गेर्डा ही एका सामान्य जादूगाराच्या घरात जन्मलेली असामान्य मुलगी आहे, जिला तूर्तास तिच्यात असणाऱ्या जादुई कौशल्याचे ज्ञान नाही. राजाने राज्यातील सर्व जादूगारांना धनाचे आमिष दाखवून बर्फाच्या राणीच्या जगात बंदिस्त केले आहे, जिथून कोणीही परत येऊ शकत नाही. त्यात गेर्डाचे आई वडील आणि भाऊही आहे. गेर्डा आपल्या कुटुंबाला सोडवण्यात यशस्वी होईल का? हे चित्रपटात कळणार आहे.

“पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ आणि बाल दिवसानिमित्त बालकांना मनोरंजनासोबतच माणूस म्हणून जगण्याची चांगली शिकवण देणारा चित्रपट ‘बर्फाची राणी’ अल्ट्रा झकासच्या माध्यमातून सादर करताना मनापासून आनंद होत आहे. असेच अनेक अॅनिमेटेड चित्रपट ओटीटीवर उपलब्ध असून आणखी नवनवीन चित्रपटांसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या. ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर ‘‘बर्फाची राणी’ या सुपरहिट चित्रपटासोबतच झकास मनोरंजन, सदाबहार एकापेक्षा एक कौटुंबिक कथा, विनोदासह जबरदस्त अॅक्शन थ्रिलर चित्रपटांतील ड्रामा अनुभवण्यासाठी लगेच डाउनलोड करा ‘अल्ट्रा झकास ओटीटी’ ॲप आणि तुमच्या कुटुंबासोबत अमर्याद आनंद घ्या अल्ट्रा झकास वरील एचडी कन्टेंटचा.