मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

0

मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

भंडारा, दि. 7 : सिव्हील लाईन परिसरातील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू असून पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन समाजकल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.

इयत्ता आठवी ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, गणवेश, मासिक निर्वाह भत्ता, स्वतंत्र अभ्यासिका, व्यायामशाळा, क्रीडांगण, टी. व्ही. मनोरंजन इत्यादी निशुल्क सुविधा पुरविण्यात येतात. प्रर्वग निहाय रिक्त जागा व अर्ज सदर करण्याच्या मुदतीबाबत अधिक माहिती वसतिगृहात उपलब्ध आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here