प्रा. नागनाथ मनुरे यांना गोंडवाना विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान

प्रा. नागनाथ मनुरे यांना गोंडवाना विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान

प्राध्यापक नागनाथ मनुरे हे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे अर्थशास्त्र विभागात कार्यरत आहेत
राजुरा येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील प्राध्यापक नागनाथ जयवंतराव मनुरे यांना गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने अर्थशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

प्रा. डॉ नितीन कावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली “नांदेड जिल्ह्यातील मातंग समाजाचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्थितीचे चिकित्सक अध्ययन” या विषयावर त्यांनी पदवी प्राप्त केली आहे. प्राध्यापक मनुरे यांनी महाविद्यालयात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदांचे यशस्वी आयोजन केले. तसेच त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील संशोधन जर्नल्स मधून संशोधन पेपर प्रकाशित केले आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री सुधाकररावजी कुंदोजवार, सचिव अविनाश जाधव, गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ एस. एस कावळे, प्राचार्य, डॉ एस. एम. वारकड, उपप्राचार्य डॉ आर. आर. खेराणी यांनी अभिनंदन केले , तसेच उपप्राचार्य मनीष पोतनुरवारवार, डॉ विश्वास शंभरकर, डॉ संतोष देठे, डॉ आर. एस. मुद्दमवार, डॉ एस. एन. शेंडे, डॉ वनिता वंजारी, डॉ सारिका साबळे, डॉ संजय लाटेलवार, प्रा.गुरुदास बल्की, प्रा. विठ्ठल आत्राम, डॉ मल्लेश रेड्डी, डॉ प्रमोद वसाके, प्रा.किरणकुमार मनुरे, सचिन येगीनवार, रवी लिपटे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.