चंद्रपूर : शिवसेना प्रणित भारतीय कामगार संघटना वाहतूक विभाग महाराष्ट्र राज्य शाखा – सिंदेवाही ची कार्यकारिणी जाहीर

शिवसेना प्रणित भारतीय कामगार संघटना वाहतूक विभाग महाराष्ट्र राज्य शाखा – सिंदेवाही ची कार्यकारिणी जाहीर

दिनांक २/०७/२०२१रोजी शुक्रवार ला
शिवसेना भारतीय कामगार संघटना वाहतूक विभाग महाराष्ट्र राज्य चे राष्ट्रीय प्रदेशअध्यक्ष लक्ष्मणभाई तांडेल यांच्या नेतृतवात व जिल्हा अध्यक्ष सय्यद रब्बानी चिस्ती यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कामगार संघटना वाहतूक विभाग महाराष्ट्र राज्य सिंदेवाही तालुका शाखेची कार्यकारिणी जाहीर झाली.
सिंदेवाही तालुका अध्यक्ष पदी अमान पटेल ( क़ुरैशी ) यांची नियुक्ती करण्यात आली.तर उपाध्यक्ष पदी राहुलसिंग ठाकुर याची निवड करण्यात आली तसेच सिंदेवाही शहर अध्यक्ष पदी नवाब शेख व शहर उपाध्यक्ष पदी अंकुश सीडाम यांची निवड करण्यात आली.
सिंदेवाही तालुका शाखा संघटनेची कार्यकारिणी पदाधिकारी यांचेवर तालुक्यातील जबाबदारी आली असल्याने पक्षाला बळकटी मिळाली आहे.