मतदान पथकांना प्रशिक्षण

मतदान पथकांना प्रशिक्षण

भंडारा : लोकसभा 2024 साठीच्या जिल्ह्यातील पूर्वतयारीला वेग आला असून आज मतदान पथकांचे प्रशिक्षण रॉयल पब्लिक स्कूल , भंडारा येथे घेण्यात आले. यामध्ये भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये नियुक्त मतदान पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे, तहसीलदार महेंद्र सोनवणे तसेच भंडारा तहसीलदार विनिता लांजेवार यांनी या मतदान पथकांना  करावयाच्या कार्यवाही बाबत  विस्तृत असे मार्गदर्शन केले.

आतापर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार प्रशिक्षणाचे सत्र आयोजित करण्यात आले आहेत. पहिल्या रँडमाइझेशन प्रक्रियेनंतरचे  हे  पहिले प्रशिक्षण आहे .दुसऱ्या रँडमायझेशन नंतर पुन्हा मतदान पथकांचे प्रशिक्षण घेण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनी सांगितले.

आज या प्रशिक्षण वर्गामध्ये 1640 लोकांना दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. तर काल 1240 लोकांना दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण  सत्रानंतर काम करताना येणाऱ्या अडचणीबाबत देखील प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात शंका निरसन करण्यात आले.

आतापर्यंत लोक 11 भंडारा गोंदिया विधान लोकसभा मतदारसंघासाठी दोन नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. नामनिर्देशनपत्रे सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त 27 मार्चपर्यंत  सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सादर करता येतील. 28 मार्च रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.