कृषी संजीवनी मोहीम-दि.२५ जून ते १ जुलै, २०२२

कृषी संजीवनी मोहीम-दि.२५ जून ते १ जुलै, २०२२

खरीप हंगाम 2022 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यातील कृषि विभागाचे अधिकारी/ कर्मचारी, कृषि विभाग- जिल्हा परिषद, कृषि विद्यापीठे/ कृषि विज्ञान केंद्रे यांचे शास्त्रज्ञ, कृषिमित्र यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.
दि. २5 जून २०२2 ते ०१ जुलै २०२2 या कालावधीत प्रत्येक दिवशी महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन ‘कृषि संजीवनी मोहीम’ साजरी करण्यात येणार आहे.

1) दि 25 जून 2022 – विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार,मुल्‍यसाखळी बळकटीकरण दिन
2) दि. २६ जून २०२२ – पौष्टिक तृणधान्य दिन
3) दि. २७ जून २०२२ – महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण दिन
4) दि. २८ जून २०२२- खतांचा संतुलित वापर दिन
5) दि.२९ जून २०२२ – प्रगतशिल शेतकरी संवाद दिन
6) दि.३० जून २०२२ – शेती पूरक व्‍यवसाय तंत्रज्ञान दिन
7) दि.१ जुलै २०२२ – कृषि दिन

या मोहिमा कालावधीमध्ये संबंधित ‍ विषयाबाबत राज्यभर प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. गावोगावी शेतीशाळा, चर्चासत्र,‍ वेबिनार, प्रात्यक्षिके, सभा प्रशिक्षण, शिवारफेरी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचे सुध्दा मार्गदर्शन या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे.
राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी कृषि संजीवनी मोहीमेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने राज्यातील सर्व शेतकरी बंधुंना करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषि सहायक तसेच नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.