16 जूनला महाज्योती तर्फे चंद्रपूर येथील प्रियदर्शनी नाट्यगृहात ‘तृतीय रत्न’ नाटकाचे आयोजन

16 जूनला महाज्योती तर्फे चंद्रपूर येथील प्रियदर्शनी नाट्यगृहात ‘तृतीय रत्न’ नाटकाचे आयोजन

Ø प्रवेश नि:शुल्क

Ø रंगमंचावरील पहिले समाजिक क्रांतीकारी नाटक

चंद्रपूर, दि. 15 : येथील प्रियदर्शनी नाट्यगृहात 16 जून रोजी सायंकाळी 7 वाजता ‘तृतीय रत्न’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात येत आहे. या नाट्यप्रयोगासाठी नि:शुल्क प्रवेश ठेवण्यात आला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक ध्येयांनी प्रेरीत सामाजिक विचारांचा प्रसार व्हावा, त्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे, या हेतूने इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार, संचालक डॉ. बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे, लक्ष्मण वडले यांनी महाज्योतीच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन केले आहे.

अनिरुद्ध वनकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून क्रीएटीव्ह हेड प्रा. संगीता टिपले आहेत. प्रकाश योजना शिवप्रसाद गौड यांची आहे. प्रा.डॉ.शेखर डोंगरे, संजीव रामटेके, अरविंद खंदारे, नागसेन गायकवाड, चंद्रकांत तोरणे, दिपाली बडेकर, कल्याणी खोब्रागडे या प्रमुख कलाकारांसह एकूण 30 सहकलाकारांचा या नाटकात सहभाग असणार आहे. याआधी विविध जिल्ह्यात 35प्रयोगाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. करीता सदर नाट्यप्रयोगास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केले आहे.