नागपूर कडून भंडाराकडे येणारी सर्व वाहने एकाच मार्गाने ये-जा करतील

नागपूर कडून भंडाराकडे येणारी सर्व वाहने एकाच मार्गाने ये-जा करतील

भंडारा, दि. 22 मे : भंडारा शहराबाहेरून नव्याने निर्माण करण्यात येत असलेल्या बायपास रोडवर मौजा फुलमोगरा येथील उड्डाण पुलाचे काम सुरू होणार असून भंडारा कडून नागपूरकडे व नागपूरकडून भंडाराकडे येणारी सर्व प्रकारची वाहने नागपूर कडून भंडाराकडे येणाऱ्या एकाच मार्गाने ये-जा करतील.

 

संबंधीत काम करणाऱ्या कंपनीने मौजा मुजबी ते फुलमोगरा या दोन्ही ठिकाणी वाहतुक नियमन करण्याकरिता कंपनीचे कर्मचारी नियुक्त करावे, 24 तास क्रेनची व्यवस्था करावी व वाहतुकीच्या मार्गावर पडलेले खड्डे तात्काळ भरून दुरूस्त करण्यात यावे, असे जिल्हादंडाधिकारी सुनिल विंचनकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.