बामसेफतर्फे सिंदेवाहीत महिला परिषद 

बामसेफतर्फे सिंदेवाहीत महिला परिषद 

 

सिंदेवाही – बामसेफ युनिट तालुका सिंदेवाहीच्या वतीने भगवान बुद्ध जयंती पर्वानिमित्य आयोजित ‘कही हम भूल न जाए ‘अभियान अंतर्गत आयोजित एकदिवशीय बामसेफ स्वर्णजयंती वर्ष परिषदेची सांगता ग्रामीण पतसंस्था सभागृह सिंदेवाही येथे नुकतीच करण्यात आली .

 

परिषदेच्या अध्यक्षस्थानी डा.प्रेमकुमार खोब्रागडे सर होते .तर प्रमुख मार्गदर्शक सुप्रीम कोर्ट दिल्लीचे वकील रितेश पाटील ,वकील अस्विनी मुन नागपूर व विद्या बनसोड सिंदेवाही यांची उपस्थिती होती .

या परिषदेत महिलांचे संविधानिक हक्क ,अधिकार व सामाजिक जबाबदारी ,महापुरुषांच्या चळवळीत कर्मचाऱ्यांची भूमिका व बामसेफ गतिमानतेची आवश्यकता इत्यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले .याप्रसंगी इंजि .सचिन शेंडे ,विध्यार्थी अतिथी निर्वाण मुन व कुमारी अधीरा खोबागडे यांनीही आपले विचार व्यक्त केलेत .

 

दिवसभर चाललेल्या या बौद्धिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक बामसेफ महिला विंग्जच्या प्रमुख मीनाक्षी बारसागडे यांनी केले .संचालन प्रेमलता मेश्राम यांनी तर ज्योती खोब्रागडे यांनी आभार मानले .या कार्यक्रमाला सिंदेवाही तालुक्यातील कर्मचारी वर्ग सहपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .या कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी विजय रामटेके ,पवन जगताप ,शैलेंद्र खंडाळे ,ज्ञानेश खोब्रागडे ,तेजस डोंगरे ,नंदू खोब्रागडे ,अनिल बारसागडे आदींनी सहकार्य केले ,असे बामसेफचे मीडिया प्रभारी प्रा .भारत मेश्राम यांनी कळविले आहे .